1 Samuel 10

1तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेतली, शौलाच्या डोक्यावर ओतली, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले की नाही? 2आज तूं माझ्यापासून गेल्यावर राहेलीच्या कबरेजवळ बन्यामिनाच्या प्रांतात सेल्सह येथे तुला दोन माणसे भेटतील ती तुला म्हणतील की, ज्या गाढवांचा शोध करायला तूं गेला होतास ती सांपडली आहेत. पाहा तुझा बाप गाढवांची काळजी सोडून, तुझी चिंता करीत आहे, तो म्हणतो, मी आपल्या मुलासाठी काय करू?

3मग तेथून तूं पुढे जाऊन, ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील. तेव्हां तेथे तीन करडू नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षारसाची बुधली नेणारा एक अशी तीन माणसे देवाकडे बेथेलला जात असलेली तुला भेटतील. 4आणि ती तुला अभिवादन करून तुला दोन भाकरी देतील त्या तू त्यांच्या हातांतून घेशील.

5त्यानंतर देवाच्या टेकडीला म्हणजे जेथे पलिष्ट्यांची चौकी आहे तेथे जाशील. आणि तूं तेथे नगरास पोहचल्यावर भविष्यवाद्यांचा गट आणि त्यांच्यापुढे सतार व झांज व बासरी व वीणा वाजवणारे उंचस्थानावरून उतरत असता तू त्यांना भेटशील; ते भविष्यवाणी करीत असतील. 6देवाचा आत्मा जोराने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाणी करशील, आणि तू बदलून निराळा माणूस होशील.

7आता, जेव्हा ही सर्व चिन्हे तुला प्राप्त होतील, तेव्हा असे होवो की, तुला प्रसंग मिळेल तसे तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. 8तेव्हा तू माझ्या अगोदर खाली गिलगालास जा. पाहा होमार्पणे अर्पण करायला व शांत्यर्पणाचे यज्ञ करायला मी खाली तुझ्याकडे येईन. मी तुझ्याकडे येऊन जे तुला करायचे आहे ते तुला कळवीन तोपर्यंत सात दिवस तू माझी वाट पाहा.

9आणि असे झाले की, शमुवेलापासून जायला त्याने आपली पाठ फिरवल्यावर, परमेश्वराने त्याला दुसरे ह्रदय दिले. आणि ती सर्व चिन्हे त्याच दिवशी त्याला प्राप्त झाली. 10जेव्हा ते डोंगराजवळ आले, तेव्हा पाहा भविष्यवाद्यांचा गट त्याला भेटला आणि देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला व त्याच्यामध्ये तो भविष्यवाणी करू लागला.

11तेव्हा असे झाले की, ज्यांना पूर्वी त्याची ओळख होती, त्या सर्वांनी पाहिले की तो भविष्यवाद्यांबरोबर भविष्यवाणी करत आहे, ते लोक एकमेकांना म्हणू लागले की, कीशाच्या मुलाला हे काय झाले? शौल भविष्यवाद्यांपैकी एक आहे काय? 12तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर देऊन बोलला, त्यांचा बाप कोण आहे? यावरून, अशी म्हण पडली की, शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय? 13भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंचस्थानाकडे आला.

14नंतर, शौलाचा काका त्याला व त्याच्या चाकराला म्हणाला, तुम्ही कोठे गेला होता? तो बोलला, आम्ही गाढवांचा शोध करीत गेलो; ती नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलाकडे गेलो. 15मग शौलाचा काका म्हणाला, मी तुला विनंती करतो शमुवेल तुम्हांशी काय बोलला ते मला सांग. 16तेव्हा शौल आपल्या म्हणाला काकाला म्हणाला, गाढवे सापडली असे त्याने आम्हाला उघड सांगितले. परंतु राज्याविषयीची जी गोष्ट शमुवेल बोलला ती त्याने त्याला सांगितली नाही.

17मग शमुवेलाने लोकांना मिस्पा येथे परमेश्वराजवळ बोलावले. 18तेव्हा तो इस्राएलाच्या संतानाना म्हणाला परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, मी मिसरातून इस्राएलास वर आणले, आणि मिसऱ्याच्या हातातून व तुम्हांस पिडणारी जी राज्ये त्या सर्वाच्या हातातून तुम्हांस सोडवले. 19परंतु तुमचा परमेश्वर, जो स्वत: तुमच्या सर्व शत्रूपासून व तुमच्या संकटातून तुम्हांस सोडवतो त्याला तुम्ही आज नाकारले; आणि आम्हांवर राजा नेमून ठेव, असे त्याला म्हटले. तर आता आपल्या वंशाप्रमाणे व आपल्या हजारांप्रमाणे परमेश्वराच्या समोर उभे राहा.

20शमुवेलाने इस्राएलाचे सर्व वंश जवळ आणले, तेव्हा बन्यामिनाचा वंश निवडून घेण्यात आला. 21मग त्याने बन्यामिनाचा वंश त्यातील घराण्याप्रमाणे जवळ आणला; आणि मात्रीचे घराणे आणि कीशाचा मुलगा शौल निवडून घेण्यात आला. पण जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला तेव्हा तो सापडला नाही.

22मग त्यांनी परमेश्वराला आणखी विचारले की, तो माणूस इकडे फिरून येईल काय? तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, पाहा तो सामानामध्ये लपला आहे. 23मग त्यांनी धांवत जाऊन त्याला तेथून आणले. तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता.

24तेव्हा शमुवेल सर्व लोकांना म्हणाला, ज्याला परमेश्वराने निवडले त्याला तुम्ही पाहता काय? त्याच्यासारखा सर्व लोकांत कोणी नाही! सर्व लोक ओरडून म्हणाले, राजा दिर्घ आयुष्यी होवो!

25तेव्हा शमुवेलाने राजाच्या कारभाराचे नियम आणि कायदे लोकांना सांगितले, आणि ते एका पुस्तकात लिहून परमेश्वराच्या समोर ठेवले. मग शमुवेलाने सर्व लोकांना आपापल्या घरी पाठवून दिले.

26शौलही आपल्या घरी गिबा येथे गेला, आणि ज्यांच्या ह्रदयाला परमेश्वराने स्पर्श केला, अशा काही बलवान माणसे त्यांच्याबरोबर गेली. परंतु काही नालायक माणसे होती ती म्हणाली, हा माणूस आम्हाला कसा काय सोडवील? त्यांनी त्याचा अनादर केला व त्याला काही भेट आणली नाही. पण शौल शांत राहिला.

27

Copyright information for MarULB